भवानी मातेचे निस्सीम भक्त श्री शिवछत्रपती

श्री कालिकांबल मंदिर , थुंबी चेट्टी रोड चेन्नई

 

 
श्री कालिकंबल मंदिर, चेन्नई

 

 
दिनांक : ३ ऑक्टोबर १६७७ :
इ.स. १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले. दक्षिण दिग्विजय मोहीम महाराजांच्या कर्तृत्वाचा आणि कल्पकतेचा विस्तार दर्शवते. मोहिमेत वेल्लोर चा टप्पा झाल्यांनंतर महाराज जिंजी या दक्षिणेतील अभेद्य किल्ल्याकडे मार्गस्थ असताना चेन्नई येथील श्री काकांबल माता मंदिर येथे भवानी मातेला वंदन करण्यासाठी आले होते.चेन्नई शहर वसून तेव्हा फक्त ३८ वर्ष च झाले होते. मंदिरात महाराजांची मोठी प्रतिमा गाभाऱ्यासमोर आजही पाहायला मिळते. आज शनिवार असल्याने सकाळी १० ते दुपारी ४ मंदिर बंद असत ह्या गोष्टीची मला पूर्वकल्पना नव्हती. मी मंदिरात गेल्यावर कळलं कि मंदिर बंद आहे. तिथला सुरक्षारक्षक आत सोडत नव्हता पण मी त्याला जेव्हा सांगितले कि मी महाराष्ट्रातून आलोय मंदिराचे दर्शन घ्यायला तेव्हा त्याने मला लगेच आत घेतले तो स्वतः मला महाराजांच्या प्रतिमेजवळ घेऊन गेला आणि म्हणाला “See this Maharashtrian King Shivaji Maharaj Visited here in 1677”. जरी हि गोष्ट मला माहिती असली तरी ती त्याच्या तोंडून महाराजांची महती ऐकताना अगदी उर अभिमानाने ओतप्रोत होऊन वाहू लागला. “एक मराठा इतुका पातशाह झाला,ही गोष्ट काही साधी नव्हे” .
 
मंदिरातील महाराजांची प्रतिमा १
मंदिरातील महाराजांची प्रतिमा १
 
मंदिरातील महाराजांची प्रतिमा २
मंदिरातील महाराजांची प्रतिमा २
 
महाराष्ट्राच्या राजाचे पराक्रम इथले स्थानिक अजून देखील विसरले नाही. महाराजांचे पदस्पर्श झालेल्या या भूमीत पर्यटनाची सुरुवात अतिशय पवित्र ठिकाणावरून झाली यातच समाधान .
आता वेध लागलंय खुद्द शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या , दक्षिण दिग्विजय मोहिमेतील सर्वात महत्वाचा विजय आणि स्वराज्याची तिसरी राजधानी *किल्ले जिंजी*. दक्षिणेतील मजबूत आणि अभेद्य किल्ला.
संकेत उंचे
ईमेल आयडी : sanketunche04@gmail.com
 
 
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top