तंजावूर चे मराठे

तंजावूर महाराष्ट्रातील बहुतांश जणांना माहित नसलेला एक नाव . मराठी आणि महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व अनुभवायचा असेल तर नक्कीच येथे भेट द्यायला हवी असे हे शहर. मराठ्यांचा इतिहास तंजावूर शिवाय पूर्ण होणे नाही. कावेरी नदीच्या काठावर वसलेला तामिळनाडू मधला हे शहर येथील पुरातन ब्रिहदेश्वर मंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. इ.स. १० व्या शतकात छोला घराण्याच्या राजवटीत राजा राजा छोला याने बांधलेला हे मंदिर प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. तंजावूर शहरापासूनच जवळ कावेरी नदीवर छोला  राजा राजा ने बांधलेल कल्लाणी धरण आहे. इ.स. २ ऱ्या शतकात  बांधल्या गेलेलं हे धरण आजही उपयोगात आहे हि एक आश्चर्याचीच बाब म्हणावी. खरतर इथे जाण्याच्या आधी या शहराबद्दल बराच वाचण्यात आलं होत म्हणून एक विशेष मुहूर्त शोधून तंजावूर ची मोहीम उघडली . तंजावूर बद्दल सांगायचं झालं तर इथे भरपूर राजघराण्यांनी राज्य केलं. छोला , पंड्या , तंजावूर नायक, मलिक काफर आणि इ.स. १६७४ मध्ये विजापूर च्या अदिलशाही च्या आदेशावरून व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावूर काबीज केलं पण त्यांनी हे ठाण आदिलशाही मध्ये सामील न करता तंजावूर मध्ये नवीन मराठा राज्य  बनवले आणि स्वतः राजे बनले. मराठ्यांनी इ.स. १६७४ ते इ.स. १८५५ म्हणजे तब्ब्ल १८० वर्ष येथे राज्य केला त्यांनतर इंगजांनी तंजावूर काबीज केले.

तंजावूर रेल्वे स्टेशन
तंजावूर रेल्वे स्टेशन 
भोसले हे तंजावूर चे राजघराणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांची ही राजधानी. महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहिमेवर आपले होते तेव्हा त्यांनी कावेरी नदीच्या उत्तरेचा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट केला आणि कावेरीच्या दक्षिणेचा प्रदेश व्यंकोजीना देऊ केला. व्यंकोजींनी स्वराज्यात सामील व्हावं हि महाराजांची इच्छा होती त्यासाठी दस्तरखुद्द महाराज तंजावूर ला व्यंकोजींच्या भेटीला पण गेलेले. तंजावूर शहराच्या उत्तरेच्या वेशीवर कुण्डलून नदीच्या काठावर (तिरुमलवाडी) येथे महाराजांचा शामियाना पडला होता, व्यंकोजी देखील भेटीसाठी आले होते पण त्यांच्या मनात महाराजांविषयी भीती आणि गैरसमज होते त्यामुळे त्यांनी रात्रीतून पळ काढला. महाराज जेव्हा स्वराज्यात परतले तेव्हा त्यांनी मागे राहिलेल्या फौजेवर हल्ले देखील केले पण पराक्रमी संताजी घोरपडे यांनी व्यंकोजींच्या फौजेला चांगलाच चोप दिला. व्यंकोजी राजे जरी स्वराज्यात सामील झाले नसले तरी त्यांनी देखील तंजावूर मध्ये एक सुराज्य चालवले.
 मराठ्यांच्या राजवटीत तंजावूर हे कला, साहित्य, स्थापत्य, शिक्षण, औषधशास्त्र , गजशास्त्र इत्यादि मध्ये समृद्ध झाले. इ.स. १० व्या शतकात बांधल्या गेलेल्या ब्रिहदेश्वर (पूर्वीच राजराजेश्वर मंदिर)  मंदिरात मराठ्यांनी १६ व्या शतकात अतिशय सुंदर चित्र रेखाटली. याचा मंदिरातील भिंतीवर जगातील सगळ्यात मोठा मराठी मध्ये लिहिलेला शिलालेख आहे. शहाजी महाराज ते शिवाजी महाराज या सर्वांचं वर्णन या शिलालेखात आढळून येत. अतिशय मोठा असलेला हा मराठी शिलालेख तामिळनाडू मद्ये पाहून छाती गर्वाने फुलून येते. मराठ्यांनी येथे गणपती मंदीर बांधले याचा मराठी भाषेतील उल्लेख येथील पायऱ्यांवर आजही पाहायला मिळतो. इ.स. १६७७ मध्ये व्यंकोजी राजेंच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी तंजावूर मध्ये आले आणि त्यांनी येथे चोळीराम मठ सुरु केला. समर्थांच्या या मठात आजही ४०० वर्षांपूर्वीचे चित्र पाहावयास मिळतात.
ब्रिहदेश्वर मंदिर : तंजावूर मधील “शिवगंगा दुर्ग” या भुईकोट किल्ल्याच्या नैऋत्य बाजूस  इ.स. १० व्या  शतकात छोला राजा राजा याने बांधलेला हे मंदिर ६० मीटर उंच आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्य्या मंदिरावर आकर्षक असे शिल्प कोरण्यात आलेले आहे. मंदिर परिसर अतिशय भव्य असून चारही बाजूंना ओसरी आहे. मंदिर परिसरात गणेश मंदिर, शिव मंदिर, देवी मंदिर आहेत. मंदिराच्या मुख्य भिंतीवर इ.स. १० व्य शतकात लिहिलेला तामिळ शिलालेख आहे तर ओसरीच्या भिंतीवर इ.स. १७ व्या शतकात लिहिलेला मराठी शिलालेख आढळतो. पूर्वी राजराजेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराला मराठी राजांनी ब्रिहदेश्वर मंदिर असे नामांतर केले. मराठ्यांनी या मंदिराची डागडुजी, तसेच रंगरंगोटी केली. मंदिर परिसरात एक गणपती चे मंदिर देखील बांधले.
ब्रिहदेश्वर मंदिर
ब्रिहदेश्वर मंदिर
मराठा महाल : मराठी राजांचे हे तंजावूर मंदिल निवासस्थान . मराठा महाल मधील दरबार हॉल हा येथील मराठी राज्याची भव्यदिव्यता सांगतो. दरबार हॉल मधील सरफोजी राजे यांचे चित्र तर अगदी अप्रतिम आहे. अतिशय आकर्षकरित्या रंगवलेला हा हॉल डोळे दिपवून टाकतो. महालाच्या पहिल्या मजल्याबर वस्तू संग्रहालय आहे ज्यात छत्रपतींच्या प्रतिमा, कापड, हत्यार आणि विठठल रुख्मिणी यांची मूर्ती, राजगड किल्ल्याचा जुना फोटो अशा बऱ्याच गोष्टी पाहावयास मिळतात.

 मराठा महाल
मराठा महाल
दरबार हॉल , मराठा महाल
दरबार हॉल , मराठा महाल

तंजावूर हे येथील कला आणि साहित्य साठी अतिशय प्रशिध्द आहे आणि यात मराठयांचा सिंहाचा वाटा आहे. १८ व्या शतकात राज्यकारभार सांभाळणारे सरफोजी राजे भोसले हे अतिशय रसिक. सर्फोजींना साहित्य आणि कला यांमध्ये विशेष रुची होती. तंजावूर च्या साहित्य आणि कलेच्या प्रगतीत सर्फोजींचे योगदान अतिशय मोलाचे आहे.

त्यांनी केलेला कार्य इतका अद्भुत आहे कि हे लिहिण्यासाठी मला हि यादी बनवावी लागली.

साहित्य आणि कलेत मराठ्यांचे योगदान :
१. चित्रकलेला प्रोत्साहन. ब्रिहदेश्वर मंदिराचे छत अतिशय आकर्षकरित्या रंगवण्यात आले आणि मंदिरात मराठी राजांची आकर्षक तैलचित्रे.
२. संगीत, भरतनाट्यम आणि मराठी मैफिलींसाठी संगीत महाल बांधला.
३. सरफोजी राजेंनी जगातील सर्वात मोठं हस्तलिखित ग्रंथ संग्रहालय बनवला. (सरस्वती ग्रंथालय) ज्यामध्ये अतिशय दुर्मिळ हस्तलिखित आजही शाबूत आहेत.
४. जगातील सर्वात मोठा मराठी शिलालेख ज्यामध्ये मराठ्यांच्या इतिहास व्रणावला आहे.
५. महारांच्या हयातीत शिवकालीन कवी परमानंद यांनी लिहिलेला श्री शिवचरित्र आरंभ या मूळ ग्रंथाची प्रत इथे आजही आहे.
६. मराठ्यांच्या राजवटीला चिकित्सालय गजशास्त्र यात विशेष प्रगत झाली. पहिली दातांची शस्त्रक्रिया येथे करण्यात अली.
७. खाद्य मध्ये संभार हा पदार्थ महाराष्ट्राने तामिळनाडू ला दिला.
८. मुलींसाठी शाळा, दवाखाने, भूमिगत गटार प्रणाली राबवली गेली.
९. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत १०० एकर जमीन दान केली.
१०. महाराष्ट्रातून मराठी भाषिक येथे स्थायिक केले त्यामुळे आजही तंजावूर मध्ये मराठी भाषिक लोक सापडतात.

ब्रिहदेश्वर मंदिराच्या छतावरील चित्रे 
मराठी शिलालेख

इथले मराठी राजे हे बाहेरून आले होते पण तरीही त्यांनी केलेल्या कार्यामुळे येथील जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिले. ह्याचच एक उदाहरण म्हणजे तंजावूर शहरातील सर्वात जुना आणि ब्रिहदेश्वर मंदिर, रेल्वे स्टेशन ज्या भागात आहे त्या भागाला “शिवाजी नगर” असे नाव दिलेले आहे तसेच तंजावूर च्या भुईकोट किल्ला “शिवगंगा दुर्ग” म्हणून ओळखला जातो. मराठी होण्याचा गर्व अनुभवायचा असेल तर मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधीत तंजावूर ला नक्कीच पोहोचावं.


संकेत उंचे 
ईमेल आयडी : sanketunche04@gmail.com 

0

10 thoughts on “तंजावूर चे मराठे

  1. खूप छान माहिती दिली.. आपल्याकडे बऱ्याच जणांना माहीत नाही या बद्दल याचा प्रचार-प्रसार करून तू खूप मोठे काम करत आहेस… जय महाराष्ट्र। जय शिवराय।

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top